Monday, November 4, 2019

रांगणा आणि 'फक्त' मी...



रांगणा आणि 'फक्त' मी...

            मी ह्या ट्रिपबद्दल लोहगडाच्या आधीच लिहण्याच कारण मनजे, मी एकट्याने अणुभवलेली ती थोडीशी का आसेना ती भिती, ते माकडांच्या आवाजात नर्व्हस होण, भिती वाटूनपण, कदाचित आपल काहीतरी बरवाईट होऊ शकत याची शंका आसोनपण, माझे साथीदार कुठे आसतील ते मला शोधत आसतील का, किंवा ते मला काही इजा झाली या शंकेत मागेतर गेली नसतील ना याची चिंता करत, गाडीत तेल नसताना, चालत जातानापण दमवनारा रस्ता,बंद गाडी घेवून पार करावा लागेल याची भिती, पोटात पाणी नी अन्नाचा एक तुकडाही नसताना आपण हे करू शकेण का याची भिती, गडावर जावून फिरूण, हिंडून परत गाडीपर्यंततर येवू शकेन का याची भिती, नी चुकलोच तर किमान डँमपर्यंत रात्र होण्याआधी पोहचू शकेण का याची भिती मनात घेवून, या येवढ्या गोष्टींवर विचार करून मागून कोणी येत आसेल नसेल याची खातरजमा नसताना मी गड फिरण्याचा घेतलेला निर्णय बरोबर आहे का नाही हे माहित नसताना फक्त नवा गड नी निसर्गाच्या छायेत काही वेळ घालवता येईल, तो ही माझ्या स्वप्नातल्या काही क्षणांसारखा एकट्याने, या हव्यासापोटी कश्याचीही तमा न करता मी टाकलेली ती पावले मला कुठवर साथ देतील हेच माहित न्हवतं. पण मला त्यादिवशी माझ्या अंगातल्या त्या अतीव मस्तीची जाणीव झाली, मित्र म्हणतात तस, नी ते वेड धाडस. खरतर बिबट्या नी बाकीच्या सापांच, कोल्ह्यांच माहिती होत पण नंतर कळल की या गडावर आस्वलांच खर वर्चस्व आहे. तर हा लेख फक्त रांगणा नी फक्त मी साठी.....
             आज पाडवा, घरातले सहसा बाहेर पाठवत नाहीत, म्हणून 24-25 तारखेलाच लोहगडला जावून आलो. आणि त्यावर लिहण्याआधी रांगण्याच लिहतोय कारण पुढ तुम्ही वाचालच. घरातले नाय म्हणतात पण शेवाळे नी राजू आल्याच्या निमीत्ताने सकाळी उठून बाहेर पडलो, न खाता, न पिता...
           रांगण्याला जायच ठरलेल, मला कळंब्याला ये म्हणून सांगून,उशीर झाल्याने ही बहाद्दर पुढ गेलती, पहिल्यांदा गारगोटी, मग कडगाव नी मग पाटगाव. शेवटी चुकामुक झालीच, एकतर घरातून न खाता पिता निघलेलो, मग उशीर झालाय म्हणून फक्त गारगोटीत कडगावचा रस्ता विचारण्यासाठी थांबलेलो तेवढच नाहीतर कुठेच थांबलो न्हवतो, त्यात रस्ता माहित न्हवता, तरीही पाट्या बघत-बघत गाडी पळवत होतो.
           कडगावातून बाहेर पडलेलो तेव्हा राजूचा फोन आला, 'पाटगावात आम्ही थांबलोय ये', मग मी सुसाट पाटगाव गाठल. त्यात वाटेत एक साप आडवा गेला नी कार्ल्याची आठवण झाली. पर्वा येताना गाडीखाली साप मेला राव, खुप वाईट वाटत होत. ही शाहणी कुणा म्हाताऱ्याला रस्त्यावर थांबवून रस्त्यापासून आत कुठेतरी हाँटेलात गेलते नी नाष्टा चहा करत बसलेले, ते म्हातारबी मला बघून आत गेलय नी त्यांना सांगायलय, ते पुढ गेल म्हणून, नी ही नाष्टाची आँर्डर देवून पोट पुजेची वाट बघत तसेच बसले, हे यांच्याकडून मला नंतर कळल. मी पाटगावात यांना फोन लावायचा म्हणून थांबलेलो पण रेंजच न्हवती. मग मला वाटल गेलीत वाटत कारण पुर्ण रस्त्यावर कोणच दिसल नाही. मग मी रांगण्याची पाटी बघत सुटलो. तिथ एक आई नी मुलगा होता त्यांनी लिफ्ट माहितली त्यांना घेतल, ते म्हंटले पण एकटच निघालाय काय, मी म्हंटलो 'नाय मित्र पुढ गेल्यात'. त्यांना त्या शेवटच्या गावात सोडल नी रस्ता सुरू झाला रांगण्याचा, डँमजवळ गेल्यावर तिथ त्या काकी नसत्यातर कुठ गेलो आसतो कुणास ठावूक कारण मी रांगण्याचा रस्ता सोडून पुढं गेलतो, त्यांना विचारल तर त्या बोल्या मागून आत जायचय. तिथ पाटी होती कारण त्याचा फक्त राँडच दिसत होता. झाली सुरूवात, शेवाळे बोल्लेला 40 किमीचा जंगलातला रोडाय, खराय कारण पाटगावच्या आदीपासूनच गाव सोडल्यास जंगलच आहे, डँम पासून पुढ रांगण्याच्या पाट्या दिसतात कुणा संघटनेच्या, नी सुरूवातीचा रस्ता रानांमधून मला वाटल दोन तीन किमीवर आसेल रांगणा नी शेवाळे उगाच म्हणत होत जंगल,,, पण पुढ जाईल तस वाटत होतं माग परताव का? कारण एकतर ही पुढ गेल्यातच का हे माहित न्हवत. रस्त्यावर पाट्या जरी दिसत आसल्या तरी रांगणा पुढे आसेल आसे काहीच संकेत दिसत न्हवते ( याच कारण पुढे रांगण्याला पोहचल्याव समजल, रांगण्याचा डोंगर नी ह्या रस्त्याचा डोंगर वेगळेयत, हा डोंगर पार करायचा, टोकाव जायच नी गाड्या लावून पुढ डोंगर थोडासाच उतरून पुढच्या डोंगराव रांगणा) त्यामुळ मला चुकल्यागतय वाटत होतं, त्यात ते ओठे, सहा ओठे रस्ता आडवण्यासाठी तयार आहेत, त्यातले तीन मोठे नी एक लहानशी नदीच, पावसात जाण्यात काय अर्थ नाही. दोन दिवस पावूस थांबलेला म्हणून नायतर तिथून मागे गेलोच आसतो. कारण तेथून रांगणा किती लांब माहित नाही, पाणी जास्त आसत तर गाडी गेली नसती, रस्तावर साध काय माकडपण दिसना, त्यात मी उठल्यापासून साध पाणीही पिलो न्हवतो. तरीही मस्ती खुप आंगात त्या दीड दोन फुट पातळीच्या पाण्यातून काढली गाडी, रस्ता पुर्ण कच्चा, त्यात शेवाळ झालत, गाडी स्लिप होत होती, तरीही रेटतच होतो, एकदा गाडी स्लिपझालीपण, सायलेंसर भाजल्याने मी गाडी सोडली, खरतर सेंकदभरच सायलेंसरला पाय लागला आसेल पण घर ते हितवर गाडी बंदच झाली न्हवती त्यामुळ भाजल खच्चून, मग उचलली गाडी. गाडी सुरू होईना, मला वाटल सायलेंसरला पाणी गेल आसल तर मग माझ आवघडाय, पण झाली लगेच सुरू. गाडीत तेल टाकलेलं पण फास्ट नी न थांबता आल्याने तेल संपत आलत, दहा पंधरा किमी जाईल येवढच राहिलेल, पण तरीही गाडी रेटत होतो, कारण रस्त्यावर दोन गाड्यांच्या टायरीचे वण दिसत होते, ठरवलेल आपली माणसं नसलीतरी कोणतर आसेलच त्यांच्याकडून तेल मागून घेवू, भुक ताण विसरलेलो, कारण कोणीच दिसत न्हवत त्यात घणदाट जंगल, पाण्याच्या वाटा, रस्त्यावर शेवाळ, वेगवेगळे साप नी प्राण्यांच्या अस्तित्वाच्या पाट्या, त्यात एकटाच मी, रस्ता सोडल्यास कुठ लक्षच जात न्हवत, व्हय नाय करत गेलो शेवटी, पुढे रस्त्यावर दगडाच्या भिंती गाडी जायला रस्ता बंद, गाडीवरून उतरून पुढे पाहील तर रस्ता खुपच भयावह वाटला, त्यात माकड दंगा करत होती मला पाहून वरडत होती, रांगण्याचे पोस्टर्स तर दिसत होते पण रांगणा काय. दिसत न्हवता, रांगणा पुर्ण पठारावर पसरलाय, आस त्या पोस्टरमध्ये दिसत होत, त्याआधी मी ना पिचरमध्ये ना मँपवर ना प्रत्यक्षात रांगणा पाहिला होता, त्यात तिथ गाड्या दीसतच न्हवत्या, टायरीचे वणपण गायब, मला वाटल गाड्यांना रस्ता बाजूने आसेल मी सगळीकड पाहिल आर्धा किमी मागे गेलो, तेल पुर्ण संपायलय आस दिसत होत, मोबाईलला चार्जिंग 10०/०. पाक फाटली, वाटल जावाव माग, थोडी भिती वाटत होती, त्यात जंगल, बिबट्याच वर्चस्व, त्या स्टाँपपासून 50-60 मीटर मागे आल्यानंतर चढाला रेंज मिळते, तिथून फोन केला पहिला घरात, कारण घरात माहित होत की मी शेवाळेला भेटाय, कोल्हापुरला गेलोय, मी ठरवलेलं कोल्हापुरात जावून घरात फोन करून सांगायच, पण मी कुठे थांबलोच नसल्याने हे आता सांगत होतो. विचार केला, आडकलोच तर घरातल्यांना माहितीतर आसेल की रांगण्याला गेलोय. मग आमोलदांना फोन लागला पण ते आलेच न्हवते, त्यांचाही फोन कुणाला लागेना, थांबल्यावर तहाण नी भुकेची जाणीव झाली, त्यात गाडीत तेल नाही, सगळीकडनच पंचाईत, मरूदे म्हंटल जावूया पुढ...
           गाडी काढली शेवटी त्या उंबऱ्यावरून, इंजिण तटल उंबऱ्याला, मग रेटली गाडी, 100-150 मीटर पुढे गेल्याव स्टाँप, तिथन तर पाकच पंचायत, म्हंटल पोस्टरला तर किल्ला दावलाय, नी गेला कुठ, गाडीला रस्ताय का पाहिल पण काहीच दिसना, तिथच एका टोकाव झाडी कमी आहे तिथून पाहिल तर पुढे रांगणा दिसला, मग राजूला, शेवाळेला हाका दिल्या पण रिप्लाय काय नाय. मग राहुदे म्हंटल ते येवोत न येवोत, आलोय तर बघून घ्याव म्हणून व्हय नाय करत, भित भित गेलो किल्ल्यावर, पण नजारा राडा होता, काय मिळल ते खायच बोल्लो स्वत:शी. मला जास्त काय नाय बिबट्याची थोडी भिती. कारण कळतच होत की पुर्ण या दोन डोंगरांवर मी एकटाच आहे, तरीही राजूला शेवाळेला हाका देत होतो. रिप्लाय काय येत न्हवताच. मग गेलो पहिल्या दरवाज्यातून आत, पुढे गेलो दुसऱ्या दरवाज्यावर, तिथ गेल्याव थोड आवाज येत होते, त्यात मीही हाका देत होतो, शेवटी मला कोणीतरी हाका मारत होतं, दोन ते तीनवेळा शिवत्या म्हणून हाका ऐकू आल्या, पण मी रिप्लाय केल्याव कोणच हाक देत न्हवत, आपली नसलीतरी कोणतर आसेल या जाणीवेणे पुढे जास्त आवाज यायल्याव पुढच्या बुरूजावर जावून पाहिल तर ही बहाद्दर आलतीत, मग एकमेकाला शिव्या देत शेवटी तेंच्याकडून घेतलेल्या पाण्याच्या बाटलीतला एक घोट घेतला नी खायाला कायतर द्या म्हणून त्यांना शिव्या द्यायला लागलो...
           मग एकत्र होऊन जेवलो, पुर्ण किल्ला पाहिला. पुर्ण किल्ला पठारावर पसरलाय, नी मध्ये वणराई. पावसामुळे फुटभर गवत सगळीकडे नी दलदलसुद्धा, पण मस्त वाटल त्या कुरणांवर बागडताना, मग किल्ल्याचे अवशेष नी संवर्धनाच्या नावावर बांधलेली मंदिरे पाहत रांगण्याच्या नेरूत्य मध्यावर एक दरवाजा आह तिथे पोहचलो. तो झाडीमुळे दिसतच न्हवता तो साफ करत पुढे गेलो तर त्या दरवाज्याला लागून आणखी एक दरवाजाय त्यातून गडावरून वाहणाऱ्या लहान धबधब्याच पाणी बाहेर पडत, बस स्वर्ग पाहायला मिळाला तो इथेच. एका ठिकाणी आस्वल पहुडलेल्या खुणा दिसल्या, मग त्या दरवाज्याची साफ सफाई करून, बघून परत येण्यासाठी आलो. मग पुर्ण वेळ मी कसा चुकलो, रस्त्यावरून येताना कोण कोण पडल, कस कुठ पडल, या विषयांवर चर्चा करत कोल्हापुर गाठलं.

https://www.instagram.com/p/B5qMo6ejoOu/?igshid=1bekn4nwt0ey6.
 The pictures on insta,,, follow us