Monday, July 15, 2019

मी, पावूस नी पन्हाळा

 मी, पाऊस नी पन्हाळा...         


            पाऊस मनजे माझ्यासाठीतर  स्वर्गच. पावसात भिजायला मला मी बारका आसताना लहान होतो तवापासून आवडत. गेली दोन वर्षे पन्हाळा म्हंटल की माझ घरच झालय. NSS, कँप सपला की कुठ जायच, तर 'पन्हाळा'. नी शेवाळे भेटल्यापासूनतर पन्हाळा नी पावनगड हे माझ्यासाठी पर्ड्यात(परस) गेल्यासारखच. आणि एकटाच जाणार, बाकीचे सगळे कस का येईनात मी नी माझी गाडी आणि पाऊस, भिजतच जायच. खुप दिवसांपासून मला खरा नी पुर्ण पन्हाळा पाहायचा होता. पण योगच जमत न्हवता, शेवटी आम्हाला मुडागडावर परिचित झालेले आमचे काही मित्र मंडळी, त्यांना पन्हाळा पाहायचा होता नी त्यामुळेच शेवाळेच आनंत्रण मलाबी आलं. मग काय घरातली पाऊस, पाऊस करत आसतानाही, जरासा कमी आल्या निघलो बाहेर. मग काय बाहेर पडतोय तवरकाच, पावूस सुरू, आम्हाला कुठ फरक पडतुय. गेलो भिजत. नी माझी गाणी compulsary, पाऊस आसो वा आणि काही. काँड बाद झाल तरी चालल. एक वेगळाच उत्साह येतो, पावसात भिजत, गाणी ऐकच, एकटच गाडीवन फिरण्यात. मी तर खुप फिरलोय, तुमच तुम्हालाच माहित. शेवटी पोहचलो राव, पावसात भिजताना destonation  येवूच नये आस वाटतय. पण नाईलाज आल तर उतराव लागत..... बुधवार पेढेतूनच धुक्यात प्रवेश. Feeling एकदम ढगात. ते पुढ गेलते, मी सांगितलेल मी आल्याशिवाय सुरू नाय करायच म्हणून मी पाहिलेलच ठिकाण ते पाहायला गेले. मग काली बुरजाजवळ मी त्यांना join झालो. गाडी शिवा काशीदांच्या समाधी जवळ. मग तिथन चालत काली बुरजाकडं. भिजलेलो पुर्ण.
             मग आम्ही एकत्र आलो. त्यांनी सकाळी 10 : 45 ला चार दरवाज्यातून उतरून गड पहायला सुरुवात केली . शिवा काशीद समाधी पासून रेडेघाटी , मग येथे मी त्यांना join झालो. तिथनं भुयारातन पडकोटात आलो . तो सगळा भाग धुक्यात बघितला.  किल्ल्याची ठेवण नी किल्ल्याचा इतिहास संदर्भांची देवाण - घेवाण करत अंधारबावला यायला अडीच वाजलं. तिथ न भिजलेली मुल-मुली आमच्याकड मनगाड्यावानी बघत हुतीत. जणू यांना आमच्यासोबत हिंडाचच हाय. पण प्रत्येकाच्या नशीबात स्वर्ग थोडाच येतो. मग अंबरखान्याजवळ झुणका भाकरीवर ताव मारून सोमेश्वर तलाव , छत्रपतींची स्मशानभूमी परिसर पाहत, छत्रपती शिवाजी (दुसरे) यांचीही समाधी पाहिली, कोण बोलनारच नाही की ही त्यांची समाधी आहे. खरच स्थानिक झोपलेत पन्हाळ्यावरचे. मागच्या वर्षी तर तिथे कचराच टाकायला सुरूवात केलती, मग शेवाळेन स्वत:लक्ष घालून ते थांबवल. आमची एक संस्था आहे, पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा. शेवाळे त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे. तर पुढे संभाजी महाराज मंदिर , धर्मकोठी , नायकणीच्या सज्जा (इथही पुरातत्व खात्यान वाट लावलेय, नायकीनीच्या सज्याला माडी होती (पायऱ्या) त्या तुटल्यावर, पुप्ण पाडून तिथ भिंतच घेतलीय) पाहून तटावरून शिवा काशीद पुतळ्याकडे चाललो . काही ठिकाणी तटबंधी ढासळत चालली आहे . खालच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. शेवाळे म्हणतोय, 'लवकरच पन्हाळ्याचे स्थानिक जाणकार , अभ्यासक आणि प . इ .स. चे कार्यकर्ते या सर्वांची मिळून एकत्रित भटकंती मोहीम आखू. यातून माहितीची देवाणघेवाण आणि त्यावर चर्चा होईल.' सकाळी 10 : 45 ते 04 : 30 या वेळेत फक्त आम्हाला पन्हाळा एक चतुर्थांश भाग पाहता आला. मग मीही कपडे बदलून (मी कायम एक जोड कपडे जास्त घेतो भटकंतीला जाताना, फायदाच होतो) गाडी आमोलदांच्या घरी नेली नी जरा चर्चा केली, मग शेवाळेला घरी सोडून मी माझ्या घरी भिजतच...


                     @insta - https://www.instagram.com/p/CA1z-skJIMp/?igshid=14q4k7ins1ogh

@youtube - https://www.youtube.com/channel/UCZkFHCtx-JL9pPQYrYO1ppA